मुंबई नगरी टीम
मुंबई । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले.याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत विशेष आभार मानले.तर दुसरीकडे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकास अराखड्यासाठी अर्थसंकल्पात ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्ठमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले तसेच आभार मानले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले.याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत विशेष आभार मानले.यावेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला व त्यांना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले.या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.
तर दुसरीकडे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विकास अराखड्यासाठी अर्थसंकल्पात ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्ठमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले तसेच आभार मानले. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी दिली.श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या शिष्ठमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या समाधी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ, पुणे जिल्ह्यातील सासवड येथील संत सोपानकाका महाराजांचे समाधीस्थळ, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे, त्याबद्दलही देवस्थान समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन करुन आभार मानले. यावेळी श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, विठ्ठल मंदिर रुक्मिणी समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुलवड, शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड माधवी निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.