मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून शरद पवारांनी एकदा नव्हे दोनदा रोखलं

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुस-या दिवशी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून सुरत गाठले त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते.दुसरीकडे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत होते मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयानेशिंदे गटाला आज मोठा दिलासा आहे.येत्या १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करु नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे.तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. येत्यापाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे राजीनामा देणार होते असे समजते. शिवाय एकनाथ शिंदे यांनी २१ आमदारासह सूरत गाठले त्याच दिवशी उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते.त्याच रात्री मुख्यमंत्री ठाकरे हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार होते.त्याच वेळी ते राजीनाम्याची मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखल्याचे सांगण्यात येते.त्याच्या दुस-याच दिवशी पुन्हा ठाकरे राजीनामा देण्याचा विचार करत होते.त्यांनी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. पण पुन्हा एकदा पवारांनी मध्यस्थी केली असल्याचे म्हटले जाते.

Previous articleसंजय राऊत शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत ते शिवसेना संपवायला निघालेत
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आवाहन..काय म्हणाले मुख्यमंत्री !