मुंबई नगरी टीम
मुंबई । शिंदे गटात सहभागी झालेले माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करीत शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला.त्यापूर्वीच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.या कारणास्तव पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माजी मंत्री रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे.