मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील शिंदे सरकारने ग्रामीण भागात वाढत चाललेले राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे जिल्हा परिषदेत सुधारित सदस्य संख्या करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ एवढी असणार आहे.
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका या आता २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेतानाच राज्यातील शिंदे सरकारने ग्रामीण भागात वाढलेले राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील.