राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य शासनास सादर करा

राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य शासनास सादर करा

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची विनंती

मुंबई : राज्य शासनाच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड व सदस्य सुवर्णा रावल यांची आज भेट घेतली.

राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड व सदस्य सुवर्णा रावल यांची आज भेट घेतली. या भेटीत मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणासंदर्भात आयोगाचा अहवाल तातडीने राज्य शासनास देण्याची  विनंती केली.या शिष्टमंडळात शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार आशिष शेलार,आमदार प्रवीण दरेकर आदींचा समावेश होता.

Previous articleआरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक
Next articleसरकारवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा काढावा : खा. अशोक चव्हाण