मराठवाड्यात सर्वात मोठा १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकला

मुंबई नगरी टीम

लातूर : मराठवाड्यातील सर्वात मोठा, १५० फूट उंच राष्ट्रध्वजाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. या माध्यमातून राष्ट्रभक्तीचा नवा लातूर  पॅटर्न दृष्ट लागण्यासारखा असून, हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात नेणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी तालुका ठिकाणी क्रीडा संकुल उभारणीसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी कामगार मंत्री निलंगेकर केली असता, खेलो इंडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांनी विभागीय, जिल्हा व तालुका स्थरावर जी क्रीडा संकुले उभारण्यास दुप्पट निधी दिला आहे, यासाठी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव पाठवून तत्काळ कार्यवाही करावी असे निर्देश क्रीडामंत्री तावडे यांनी दिले.विश्वात सर्वात उंच तिरंगा असावा अशी प्रत्येक भारतीयाची भावना असते या भावनांची पूर्तता लातूरमधून होत असून पुन्हा एकदा लातूर पॅटर्न सिद्ध झाला आहे. राष्ट्रभवना व देशभक्ती अधिक जागरूक व्हावी याकरता या राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली असल्याचे निलंगेकर यांनी सांगितले. कार्यक्रमास हजारो युवक उपस्थित होते.

Previous articleराज ठाकरे यांच्यासाठी’बेस्ट’संप
Next articleकेंद्रात पुन्हा मजबूत सरकारचा भाजपाचा विजय संकल्प :  पीयूष गोयल