भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा आज केली असून, लोकसभेच्या भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार आहेत. विधानसभेत मित्र पक्षांना जागा देवून उर्वरित निम्म्या निम्म्या जागाचे वाटप  भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांच होणार आहे.

भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज वांद्रे येथिल सोपिटेल या पंचतारांकित हॅाटेल मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी  युती संदर्भात चर्चा केली. त्यानंतर सुमारे अर्धा तास झालेल्या बैठकीनंतर मुक्यमंत्री फडणवीस भाजपाध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे एकाच गाडीत बसून वरळीच्या दिशेने गेले. वरळीच्या एका हॅाटेल मध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुक्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. भाजपा लोकसभेच्या २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे. लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या जागांचे वाटप आज जाहिर करण्यात आले. मित्र पक्षांना जागा सोडून उर्वरित निम्म्या निम्म्या जागा दोन्ही पक्ष लढविणार आहे.

महत्वाचे मुद्दे….

कोकणातील नाणार प्रकल्प इतरत्र हलविणार

मुंबई ठाण्यातील ५०० चौ.फुटांच्या  घरांच्या करात सूट

शिवसेना भाजपाचे नेते लवकरच राज्यव्यापी दौ-यावर

दुष्काळी भागात जावून  मदत करणार

Previous article१ मार्चला राहुल गांधींची मुंबई धुळ्यात जाहीर सभा
Next articleभाजप शिवसेनेला जनता घरी बसववणार