विरोधकांचा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार

विरोधकांचा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे.राज्यपाल हे पद घटनात्मक असताना, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली असल्याने त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे  याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घातला असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, राज्यपाल सी. विद्यासागरराव यांचे मध्यवर्ती सभागृहातील अभिभाषण झाले. मात्र विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला.त्यापूर्वी राज्यपालांचे विधानभवनात आगमन होताच विरोधकांनी ‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, अशी घोषणाबाजी केली. राज्यपाल हे पद घटनात्मक असताना राज्यपालांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली. त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे  याबाबत शंका असल्याने आम्ही त्यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला असल्याचे असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आजपासून सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सात दिवस चालणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, दुष्काळ, आदी मुद्यावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची रणनिती आखली आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.

Previous articleचहापानाचा कार्यक्रम आयोजित करणे ही सरकारची असंवेदनशीलता
Next articleआज शिवसेना भाजप आमदारांचे वर्षा बंगल्यावर “ स्नेहभोजन”