काही अभियांत्रिकी संस्थांनी केवळ शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडलाय!

काही अभियांत्रिकी संस्थांनी केवळ शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडलाय!

मुंबई नगरी टीम

नाशिक : महाराष्ट्रात आज गरजेपेक्षा जास्त संस्था उभा राहिल्याने संस्था चालविणे अत्यंत कठीण झाले आहे मात्र उत्तम शिक्षण दिले उत्तम संस्था चालविली, दर्जा उत्तम ठेवला तर त्या ठिकाणी विद्यार्थी कमी पडणार नाही.मात्र महाराष्ट्रात सद्या काही अभियांत्रिकी संस्थांनी केवळ शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडला आहे. त्यामुळे यासाठी समाजाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांमधून अधिक उद्योजक कसे घडतील यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित लोकनेते गोपीनाथजी मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय नवीन इमारत उद्घाटन व लोकनेते गोपीनाथजी मुंडे पुतळा अनावरण समारंभ आज त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार पब्लिक स्कुलच्या वतीने संस्थेसाठी वसंतराव नाईक शिष्यवृत्ती आणि गोपीनाथ मुंडे शिष्यवृत्ती घोषणा करून प्रत्येकी २५ लाख रुपये त्यांनी देणगी देण्याची घोषणा केली.

छगन भुजबळ म्हणाले की, बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करण्याचे काम स्व. मुंडे यांनी केले. भुजबळ हे आमचे नेते असून माझे मोठे बंधू आहे असे सांगून राजकारणापालिकडे भूमिका घेतल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. शाहू फुले आंबेडकर यांनी शिक्षणाची कवाडे बहुजन समाजाला खुली करून दिली. त्याचाच आदर्श क्रांतिकारक वसंतराव नाईक यांनी घेऊन शैक्षणिक चळवळ अधिक बळकट केली. आणीबाणीच्या काळात मुंढे साहेब यांना अटक झाली. त्यातूनच मुंढे यांच्या रूपाने बहुजन समाजातील नेता जन्माला आला. शिवसेना भाजप युती करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. अत्यंत प्रभावी भाषण करण्यामध्ये गोपीनाथ मुंडे अधिक सरस होते. समीर भुजबळ खासदार असतांना ओबीसींची जनगणना करण्याची मागणी घेऊन मुंडे यांच्याकडे गेले त्यावेळेस त्यांनी पाठींबा दिला. यासाठी मुंडे साहेबांनी स्वतः नेतृत्व करत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र अद्याप देखील हा प्रश्न प्रलंबित असून मित्र गोपीनाथ मुंडे यांचे राहिलेले अधुरे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहील. शेवटच्या श्वासापर्यंत मी गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिलदार मित्राला विसरू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleआणि…पंकजाताईंच्या दिशेने शरद पवारांनी पुढे केले रायटींग पॅड
Next articleनरेंद्र मोदींकडून जवानांच्या शौर्याचेही राजकारण : शरद पवार