भारिप बहुजन महासंघ नाव होणार इतिहासजमा

भारिप बहुजन महासंघ नाव होणार इतिहासजमा

मुंबई नगरी टीम

अकोला : राज्याच्या राजकारणात अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि हिंदुत्ववादी शक्तीना तिसरा पर्याय म्हणून पाहिला जाणारा भारिप-बहुजन महासंघ  हे नाव आता इतिहासजमा होणार आहे. अकोला येथे आज पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की,लोकसभा निवडणुकीनंतर भारिप-बहूजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन केला जाणार आहे. यामुळे आंबेडकर यांचे नेतृत्व आता दलित वर्गापुरते न राहता इतर जातींपर्यंत विस्तारणार आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

पक्ष विसर्जित करण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरु करणार असल्याच आंबेडकर म्हणाले. आंबेडकरांच्या या निर्णयामुळे रिपब्लिकन चळवळीतील भारिप-बहूजन महासंघ नावाचे ‘पर्व’ संपुष्टात येणार आहे.आंबेडकरांनी यातून  आपल्या राजकीय कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे,असे बोलले जाते. रिपब्लीकन नावातून एकाच म्हणजे दलित समाजाचे नेतृत्व  करण्यापेक्षा बहूजन नावाने सर्वांना सोबत घेण्याच्या दृष्टीने आंबेडकरांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.

निवडणूक प्रचारात आंबेडकर यांच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुंबईत त्यांच्या शिवाजी पार्क येथील सभेला विक्रमी गर्दी झाली. यामुळे आंबेडकर यांना स्वतःला अधिक मोठ्या मंचावर स्थापित करण्याची इच्छा झाली असावी,असा विश्लेषकांचा अंदाज आहे.पण आंबेडकर यांना आता नाव बदलून नव्हे तर आक्रमकतेने राजकारण करावे लागणार आहे. मध्यममार्गी काँग्रेस आणि उजव्या गटांच्या प्राबल्यातून मार्ग काढताना सर्व बहुजन जातींची साथ त्यांना मिळू शकते.

 

Previous articleखोतकरांचे काही ठरेना,दानवेंना टेन्शन
Next articleराधाकृष्ण विखे पाटील प्रचारातून अलिप्त राहणार