राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार ?

राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर उद्या मंगळवारी रंगशारदा हॉल येथे होणा-या पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एक पत्रक काढून मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता उद्या मंगळवारी रंगशारदा हॉल येथे मनसे पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुक माघारी नंतर राज ठाकरे आता उद्या कोणती घोषणा करणार किंवा  कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करतील असे बोलले जात होते. परंतु, आता उद्याच्या मेळाव्यात राज ठाकरे एखाद्या पक्षाला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Previous articleअशोक चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर ?
Next articleपुण्यातून आयारामांना उमेदवारी देण्यास विरोध