बड्या बदल्यांच्या मागचे गौडबंगाल काय ?

बड्या बदल्यांच्या मागचे गौडबंगाल काय ?
मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही असे अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. हे नेमके काय गौडबंगाल आहे? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई मनपाचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची बृहन्मुंबई मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. घाईघाईने केलेल्या या बदल्यांवर आक्षेप घेताना मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? याचे उत्तर जनतेला उत्तर द्यावे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

Previous articleदुष्काळप्रश्नी काँग्रेसचे राज्यपालांना साकडे
Next article‘जलयुक्त’वर खर्च केलेले हजारो कोटी कोणाच्या घशात गेले?