१८ जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

१८ जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : येत्या १७ जून पासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार असून, १८ जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यात आले.

येत्या १७ जून पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी आधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाचे कामकाज ३ आठवडे चालणार असले तरी प्रत्यक्षात केवळ १२ दिवसच  कामकाज होणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.या पावसाळी अधिवेशनात १८ जून रोजी राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. तर २१ व २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होईल.मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर येत्या १९ व २० जून रोजी चर्चा होईल.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची रूपरेखा ठरविण्यात आली.

Previous articleमंत्रिमंडळ बैठकीत हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले
Next articleबैठक महाआघाडीची मात्र चर्चा वंचित बहुजन आघाडीची