मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील  प्रलंबित विकास कामे मार्गी लागणार 

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील  प्रलंबित विकास कामे मार्गी लागणार 

मुंबई नगरी टीम

मुंबई : दहिसर जकात नाक्याच्या मोकळ्या भूखंडावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासह, मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विविध विकास प्रलंबित कामांबाबत, आमदार प्रवीण दरेकर यांनी महापालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्यासोबत संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक नुकतीच घेतली. यावेळी सर्व विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत, राम नगर, शंकर डोंगरी, सावित्रीबाई फुले नगर येथील पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न,  केतकीपाडा येथे ग्रंथालयासाठी आरक्षित जागा उपलब्ध करून देणे, गॅस कंपाउंड धरखाली येथील नाल्यावर संरक्षण भिंत बांधणे, वैशालीनगर ते लक्ष्मीनगर येथील रस्ता, मनपाने ताब्यात घेणे, संभाजीनगर येथील नाला आच्छादित करणे, चोगलेनगर ते जैन मंदिरापर्यंतचा रस्ता बनविणे. काजूपाडा हनुमान टेकडी येथे जास्त क्षमतेची टाकी बसविणे, श्रीकृष्णा नदीवर बंधारा, ब्युटिफिकेशन , ब्युटिफिकेशन अँड बोटिंग प्रकल्प उभारणे, नॅशनल पार्क, कुलूपवाडी हावेलगत असलेला अनधिकृत थांबा, जानूपाडा पांडेनगर, दामूनगर येथील पाण्याच्या बंच ऑफ लाइनबाबत, मागाठाणे ‘डी. पी.’ ची अंमलबजाणी करणे, ठाकूर व्हिलेज कांदिवली पूर्व येथे भूमिगत वाहन तेलासाठी जागा उपलब्ध करणे, मागाठाणे रस्ता फेरीवालामुक्त करणे, दहिसर चेकनाका ते समतानगर हायवेलगत अनधिकृत पार्किंग समस्या, वन जमिनीवरील रहिवाशांना मूलभूत नागरी सुविधा देणे या सर्व विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

बैठकीला , आर-उत्तर दहिसरच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, आर-मध्य बोरिवलीच्या सहायक आयुक्त रमाकांत बिराजदार, आर-दक्षिणचे सहायक अभियंता राजेश आकरे, आर-मध्यचे वेंगुर्लेकर आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच आर-दक्षिणच्या प्रभाग समिती अध्यक्षा प्रीतम पंडागळे, नगरसेवक गणेश खणकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, नगरसेविका सुनीता यादव, मोतीभाई देसाई, अमित उतेकर, सागर भालघेरे, प्रदीप नायर, संजय मोरे, संजय घाडगे, राकेश चवाथे, सम्राट कदम आणि वन हक्क समितीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.

Previous articleज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील
Next articleअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष  आक्रमक रणनीती ठरवणार