राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर

राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये  पडणाऱ्या जोरदार पावसामुळे आज मंगळवार २ जुलै २०१९ रोजी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे.मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबईतील रेल्वे सेवेला बसला असून, मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. अनेक भागांत रेल्वे रुळांजवळ पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झालेला  आहे. मुंबईत मागच्या ४८ तासांहून अधिक काळ पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे वाहतूक आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा व महाविद्यालयांना आजच्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळा तसेच महाविद्यालयात पाठवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleमालाड मध्ये झोपडपट्टीवर भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू  
Next articleमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत