“त्या”खेकड्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा
मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात आज रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्याच्या निषेधार्थ जबाबदार सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.दरम्यान जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला काही वर्षापासून तडे गेले होते स्थानिकांनी त्यासंबंधी विभागाला अनेक वेळा निवेदने देऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती.परंतु या सरकारच्या दुर्लक्षपणामुळे धरण फुटून आज निष्पाप २३ जणांचा बळी गेला.शासनाला या गोष्टीचे गांभीर्य तर नाहीच तर उलट जलसंधारण खात्याचे मंत्री तानाजी सावंत बेताल वक्तव्य करत आहे.खेकड्यांमुळे धरण फुटले हे सांगून अंगकाढूपणा सरकार करत आहे.खेकड्यांवर आरोप करून हे प्रश्न सुटणार नाही.खेकड्यांनी हे धरण फोडले असा आरोप संबंधित मंत्री व अधिकारी करत असतील तर त्या खेकड्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.