भर पावसात राष्ट्रवादी युवकचे बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन

भर पावसात राष्ट्रवादी युवकचे बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन

मुंबई नगरी टीम

ठाणे : आज राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश तर्फे ठाणे येथे भरपावसात वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राज्यातील फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.यावेळेस सुशिक्षित बेरोजगारांचे प्रतिनिधी म्हणून चने विकणे, बूटपॉलिश करून राज्यसरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

आज महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या १९ कंपन्या बंद पडल्या असून छोटे मोठे उद्योगधंदे देशोधडीला लागले असून सुमारे  ३०लाख  लोकं बेरोजगार झाले आहे म्हणून या मस्तवाल व काहीच न करणाऱ्या या सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई  शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, ठाणे जिल्हा प्रभारी अभिषेक बोके यांनी केले.यावेळी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष मोहसीन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील,उपाध्यक्ष सिद्धांत व्हटकर, तन्मय पाटील, महिलाध्यक्षा सुरेखाताई घाग, युवती अध्यक्षा प्रियांका सोनर, सामजिक न्याय अध्यक्ष कैलास हाऊले, प्रदेश सरचिटणीस हैदर शेख, तसेच दिपक पाटील, सुधीर शिरसाट, राहुल सिंग, संतोष मोरे, रोहित भंडारी, अजय मिश्रा, विक्रांत घाग, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleविधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या
Next articleमालाड दुर्घटनेतील गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत