मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दिल्या अण्णा हजारेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

मुंबई नगरी टीम

मुंबई । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस असून,त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मात्र राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून मार्मिक शब्दात अण्णांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लष्कर,नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने काल अग्निपथ योजना जाहीर केली.या सैनिकांना अल्पकाळासाठी भरती केले जाईल.संरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या योजनेला मंजुरी दिली आहे.केंद्र सरकारच्या याच निर्णयाचा आधार घेत गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी अण्णांना हटके शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मंत्री आव्हाड यांनी अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, प्रिय अण्णा…..आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई,वाढती बेरोजगारी,सामाजिक तेढ,ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल ह्याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा. अशा हटके अंदाजात त्यांनी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने आव्हाडांच्या या शुभेच्छा चांगल्याच चर्चेत आहेत.

Previous articleमहाराष्ट्रात मराठी आणि गुजराती दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकात विरघळून गेलेत
Next articleराज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभाग पुन्हा सतर्क आता ‘हर घर दस्तक’