मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सत्कार केलेले रणजितसिंह डिसले कोरोना पाँझिटीव्ह

मुंबई नगरी टीम

सोलापूर : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवॉर्ड” या पुरस्काराचे विजेते सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची बाधा झाली आहे.कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.

जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल रणजितसिंह डिसले यांचा सत्कार करण्यात आला होता.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदी मंत्री उपस्थित होते.त्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.आज बार्शीत येताच त्यांना ताप आला.त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यावर त्याचा अहवाल पाँझिटीव्ह आल्याने मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह अनेक मंत्री नेत्यांच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र डिसले गुरुजींचे कुटूंबीयांचा चाचणी निगेटिव्ह आली आहे.

Previous articleबलात्कार,ॲसीड हल्ला आणि बालकांवर अत्याचार करणा-याला होणार मृत्युदंडाची शिक्षा
Next articleचीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करा,दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांचा टोला