पार्किंगच्या जुलुमी फतव्या विरोधात लढा देण्याची गरज : शरीफ देशमुख

पार्किंगच्या जुलुमी फतव्या विरोधात लढा देण्याची गरज : शरीफ देशमुख

मुंबई नगरी टीम

मुंबई : पार्किंगला शिस्त लावण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या पार्किंगपासून एक किमी अंतराच्या आत पार्किंग केल्यास ७ जुलैपासून एक ते दहा हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या या कठोर निर्णयाविरोधात सर्वच स्तरातून आवाज उठणे गरजेचे असून, या विरोधात सर्व वाहतूकदार संघटनांनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज आहे, असे आवाहन नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांनी केले आहे.

मुंबईत दररोज शेकडो वाहनांची भर पडत असून आता ही संख्या ३३ लाख ५२ हजारांवर गेली आहे.बेकायदा पार्किंग केलेले वाहन टोइंग केल्यानंतर मालकी हक्काचा दावा मालकाकडून सांगण्यात येईपर्यंत प्रतिदिन विलंब आकारणीलावली जाणार आहे. संबंधित वाहन जर मालकाने ३० दिवसांच्या आत सोडवून नेले नाही तर ते बेवारस समजून त्याची लिलावात विक्री करण्यात येईल.यामध्ये ट्रक, बससारख्या अवजड वाहनांना टोइंग शुल्क ५ हजार, दंड दहा हजार, विलंब केल्यास किमान ११ हजार दंड निश्चित केला आहे. यामध्ये मोठय़ा वाहनांना किमान १५ तर कमाल २३,२५० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. या विरोधात सर्व वाहतूकदार संघटनांनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज आहे, असे आवाहन नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनो जनाची नाही, मनाची तरी बाळगा
Next articleपीक विमा कंपन्याविरुद्धचा मोर्चा म्हणजे शिवसेनेची निव्वळ नौटंकी