बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मंत्रालयावर धडक

बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मंत्रालयावर धडक

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयावर धडक देवून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न केला.अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलीसांची तारांबळ उडाली.त्यानंतर पोलीसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळच्या सुमाराच अचानक मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत जोरदार आंदोलन केले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे ,कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अचानक  झालेल्या या आंदोलनामुळे मंत्रालय सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांची तारांबळ उडाली. घोषणाबाजी सुरू असतानाच पोलीसांनी या आंदोलकांची धरपकड केली. त्यानंतर त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

Previous articleचंद्रकांतदादांनाच नाही तर चार मंत्र्यांना भेटलो : तटकरे
Next articleदुष्काळी भागातील १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची “संपूर्ण परीक्षा फी” माफ