शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले :  नाना पटोलेंचा आरोप

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले :  नाना पटोलेंचा आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा काढत असतांना दुसरीकडे त्याच भागात सात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट असून हे मुख्यमंत्र्यांचेच महापाप आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख व माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज अकोला येथे असतांना सात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. महामार्गामध्ये अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनिचा अत्यंत तोकडा मोबदला त्यांना मिळाला होता. इतर शेतकऱ्यांना मिळालेला जमिनीचा मोबदला व या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम यामध्ये प्रचंड तफावत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप होता. त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी एवढे मोठे पाऊल उचलले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारभाराचे हे अपयश आहे. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री करत असलेल्या मोठमोठ्या गप्पा किती पोकळ आहे हे या घटनेतून सिद्ध होते असेही पटोले म्हणाले.

Previous articleसर्व शाळांमध्ये मराठी सक्तीच्या कायद्याच्या मसुद्यासाठी समिती जाहीर
Next articleआणि ……… मुख्यमंत्र्यांनी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला