महापौर उपमहापौरांच्या निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या
मुंबई नगरी टीम
मुंबई : विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महानगरपालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात ३ महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यात ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी महापौर व उप महापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम- २०१९ हा अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.