नारायण राणेंना मदतीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : केसरकर

नारायण राणेंना मदतीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : केसरकर

मुंबई नगरी टीम

मुंबई : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुरपरिस्थितीच्या मदतीवरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यात सुरू असणारा कलगीतुरा चांगलाच रंगला असून, खासदार नारायण राणेंना मदतीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे प्रत्युत्तर गृह राज्यमंत्री केसरकर यांनी दिले आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुरपरिस्थिती हाताळण्यात प्रशासन कमी पडले असल्याची टिका करतानाच, आपण स्वत: पुरपरिस्थितीचा आढावा घेवून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आंदोलन आंदोलन छेडेल असा इशारा राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी दिला होता. राणे यांनी यावेळी दीपक केसरकर यांच्यावर निष्क्रीय पालकमंत्री अशी टिका केली होती. राणेंच्या या टिकेचा खरपुस समाचार घेत केसरकर यांनी राणेंवर प्रहार केला आहे.जे बोलतात ते कधीच काम करीत नाहीत असे प्रत्युत्तर केसरकर यांनी दिले आहे.नारायण राणे हे मोठे नेते आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यासाठी ९ कोटींचा निधी आणला तर मी माझ्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात ५६ कोटींचा निधी जिल्ह्यात आणला असे केसरकर यांनी सांगून, मदतीबाबात नारायण राणे यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला लगावला.राणे यांनी केलेल्या टिकेला कसलाही आधार नसल्याचेही केसरकर म्हणाले.

Previous articleनिवडणूकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास वर्षाची मुदत वाढ
Next articleमुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन दिवसात २० कोटींहून अधिकची भर