दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला भगदाड

दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला भगदाड

मुंबई नगरी टीम

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोपल यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

कालच आमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे बार्शीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांतील गळती सुरू आहे.सोपल यांच्यासह सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.भोर विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आत्माराम कलटे यांनीही भगवा हाती घेतला आहे. विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील व रश्मी बागल यांच्यानंतर माजी मंत्री सोपल, दिलीप माने यांनी  सोडचिठ्ठी दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पडले आहे.

Previous articleकेंद्रीय पथक पूरग्रस्त जिल्ह्यांची चार दिवस पाहणी करणार
Next articleशिवसेना-भाजपा युती होणारच : उध्दव ठाकरे