जयकुमार गोरे यांचा आमदारकीचा राजीनामा

जयकुमार गोरे यांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई नगरी टीम

मुंबई : काँग्रेस पक्षातील गळती सुरूच असून आज सातारा जिल्ह्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केल्याने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला हादरा बसला आहे.येत्या १ सप्टेंबरला ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर एकामागून एक हादरे बसत आहेत.आज सातारा जिल्ह्यातील माण खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडले असतानाच आज गोरे यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूकीत माढामधून भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा देवून त्यांनी भाजपाला मतदान करण्याचे उघड आवाहन केले होते. त्याच वेळी ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

मी दोन वेळा माण खटावचा आमदार राहिलो आहे. या वेळात मी माझ्या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात मला काही यश ही आले. पुराचा मोठा फटका माझ्या मतदार संघात पडला. सध्या टँकरने आलेले पाणी आम्ही पितो. तर चारा चावणीत लोक राहत आहेत. त्यामुळे माझ्या मतदार संघातील पाण्या शेतीची प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी जो निर्णय मला घ्यावा लागेल तो घेईन अशी मानसिकता माझी झालेली आहे. माझ्या आमदारकीचा मी राजीनामा दिला आहे. लवकरच मी पुढचा निर्णय घेईल. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे. माझ्या जाण्याने किंवा राहण्याने काँग्रेसला काहीही फरक पडत नाही. पण मी एकलव्या प्रमाणे नेत्यांवर प्रेम करत राहिलो. मी काँग्रेसशी देखील आता पर्यंत एकनिष्ठ राहिलो होतो. नुकताच ६४ गावांना पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लोकसभेला देखील माझी भूमिका स्पष्ट केली होती. ज्यांना वाटत होते माढ्यात कधी राष्ट्रवादीचा सूर्य अस्त होणार नाही.पण त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. माढ्यातून रणजित नाईक निंबाळकर हे निवडून आले. भाजपात प्रवेश कधी करायचा हे कार्यकर्ते आणि कुटुंबाशी बोलून लवकर ठरवेल.असे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या महादनादेश यात्रेच्या समारोपासाठी भाजपा अध्यक्ष केंद्रिय गृहमंत्री अमित शहा सोलापूर मध्ये येणार आहे त्यावेळी ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

Previous articleखुशखबर : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एक वर्षाच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करा
Next articleचेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा