कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास रामदास आठवलेंचा नकार  

कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास रामदास आठवलेंचा नकार  

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप  शिवसेना महायुतीसोबत राहणार आहे.त्यात होणाऱ्या जागावाटपात   रिपब्लिकन पक्षाला मिळणाऱ्या जागांवर रिपाइंचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाहीत तर  स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढणार  असल्याची माहिती  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकित रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेना महायुतीच्या अभेद्य एकजुटीतून निवडणूक लढणार आहे.राज्यातील विधानसभेच्या  २८८ जागांपैकी १८ जागा महायुतीतील मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यातील १० जागा रिपब्लिकन पक्षाला मिळणार आहेत. या १० जागांवर रिपब्लिकन पक्ष तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असून या जागांवर रिपाइंचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाहीत. निवडणूक आयोगाकडे असलेल्या राखीव स्वतंत्र चिन्हांपैकी एका चिन्हाची  रिपब्लिकन पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी  करणार असल्याची माहिती  आठवले यांनी दिली.

Previous articleस्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा
Next articleया कारणामुळे अवधूत तटकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिला !