मंत्रीपदासाठी १०० जणांची मागणी,रिपाइंच्या एका कार्यकर्त्याला मंत्रिपद मिळवून देणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पत्ता नसतानाच आता रामदास आठवले यांनी रिपाइंच्या एका कार्यकर्त्याला मंत्रिपद मिळवून देणार असल्याचे सांगितले.आपल्याला मंत्रीपद मिळावे यासाठी १०० अर्जांनी मागणी केली असल्याचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज झाली.या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यसरकारच्या नवीन मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद देण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मला रिपब्लिकन कार्यकर्ते मंत्रीपदी निवड करण्याची मागणी करीत आहेत.अशा एकूण १०० जणांनी इच्छा व्यक्त करीत निवेदन दिले आहे.त्यांच्या पैकी एका कार्यकर्त्याला राज्यात मला निश्चित मंत्रिपद मिळवून द्यावे लागेल.एका कार्यकर्त्यांची त्यासाठी मला निवड करावी लागेल. त्याबाबत लवकर मी निर्णय घेईन असे आठवले यावेळी म्हणाले. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेल दारात काही प्रमाणात कपात केली आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मेट्रो कारशेड हे आरे येथे करण्याच्या राज्य सरकार च्या निर्णयास आमचा पाठिंबा आहे. पर्यावरण आणि वनीकरणाला आमचा पाठिंबा आहे. जंगल वाढविता येईल. मुंबईच्या विकासासाठी मेट्रो सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी आरे मध्ये नीयोजित मेट्रोकारशेड ला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असे आठवले यांनी जाहीर केले.

Previous articleऔरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरणाची उद्या घोषणा
Next articleसत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही