भास्कर जाधवांसोबत ९ जिप सदस्य ७३ सरपंच शिवसेनेत प्रवेश करणार

भास्कर जाधवांसोबत ९ जिप सदस्य ७३ सरपंच शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई नगरी टीम

चिपळूण :  गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून, येत्या १३ सप्टेंबर रोजी ते 9 जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ७३ सरपंच यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भास्कर जाधव यांच्या या निर्णयामुळे गुहागर तालुका पुन्हा एकदा शिवसेनामय होणार आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलल्यांनंतर आपण राष्ट्रवादी सोडली आहे. माझे म्हणणे मी लेखी स्वरूपात त्यांना दिली आहे असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी  काँग्रेसला बसणारे हादरे सुरूच असून, अवधूत तटकरे यांच्या नंतर आता गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार  भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली.येत्या १३ सप्टेंबर रोजी भास्कर जाधव मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.माझे म्हणणे  लेखी स्वरूपात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिले असून, त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी राष्ट्रवादी सोडलीला सोडचिठ्ठी दिली आहे. ९ जिल्हा परिषद सदस्य,गुहागर पंचायत समिती आणि ७३ सरपंच माझ्यासोबत आहेत असे भास्कर जाधव यांनी सांगितले.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.या निर्णयानंतर जाधव गुहागर येथे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीत मिळत असलेल्या वागणुकीवर त्यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती.

Previous articleराज्य मंत्रिमंडळाने घेतले तब्बल ३७ निर्णय
Next articleपाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा खोटा व फसवा !