राज्य सेवा परीक्षेतील ५०६ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीला मान्यता

राज्य सेवा परीक्षेतील ५०६ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीला मान्यता

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असून या उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.

राज्य सेवा परीक्षा-२०१७ आणि राज्य सेवा परीक्षा २०१८ मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज शासनाने माहिती दिली की, राज्य सेवा परीक्षा-२०१७ च्या निकालाच्या अनुषंगाने शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणीअंती मुंबई उच्च न्यायालयाने  ८ ऑगस्ट २०१९ रोजी अंतिम आदेश दिले.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा परीक्षा, २०१७ साठी शिफारस करण्यात आलेल्या ३७७ उमेदवारांची सुधारित यादी ९ सप्टेंबर २०१९ रोजी शासनास प्राप्त झाली. हे ३७७ उमेदवार आणि राज्य सेवा परीक्षा, २०१८ अन्वये  शिफारसप्राप्त १२९ असे एकूण ५०६ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार या सर्व उमेदवारांना एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत रुजू होण्याचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Previous articleकांदीवली पूर्वेतील जनतेची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार
Next articleपवारांनी जो सन्मान दिला तितका सन्मान भाजपच्या सात पिढ्यासुद्धा देणार नाही