वंचित बहुजन आघाडीची २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई नगरी टीम
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केला आहे. आजपर्यंत प्रस्थापित राजकीय पक्षांनी ठराविक एका जातीच आणि कुटुंबशाहीच राजकारण केले.त्यामुळे इथला आलुतेदार बुलुतेदार वर्ग सत्तेपासून वंचित राहीला या वर्गाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
आंबेडकर भवन येथे पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभेसाठी २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पुन्हा या वंचित समूहातील दुर्बल अल्प लोकसंख्येच्या अलुतेदार, बलुतेदाराना रिंगणात उतरवणार आहे. या समाजातील उमेदवारांची पहिली यादी त्यांच्या समाजाची नोंद करून आम्ही आज प्रसारित करत असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.
या यादीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेले करविर मतदार संघाचे उमेदवार डॉ.आनंद गुरव हे तर आम आदमी पक्षाचे उमेदवार असल्याचे निदर्शनास आणून देताच आंबेडकर म्हणाले की,ते कालच आमच्याकडे आले होते. आमच्या समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.मात्र त्यांनी आम आदमी पक्षाकडे उमेदवारी मागितली होते असे त्यांनी सांगितले.तर १४ नंबरचे उमेदवार लालसू नागोटी अहेरी मतदार संघाचे उमेदवार हे स्थानिक ग्रामसभा संघटनेचे उमेदवार आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिले आहे.असे त्यांनी सांगितले. एमआयएमशी युती होणार आहे का या बाबतीत विचारता ते म्हणाले की,युती बाबत चर्चा करण्यासाठी आमची समिती कार्यरत आहे.एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याशी चर्चाही झाली आहे मात्र त्यांनी चर्चा करण्याच्या दरवाजाला टाळे लावल्याने मिडीयामधून चर्चा करीत असतील तर त्याला काय अर्थ नाही असेही आंबेडकर म्हणाले.
२२ उमेदवारांची यादी कंसात मतदारसंघ – सुरेश जाधव ( शिराळा ),डॉ.आनंद गुरव (करविर), बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे (दक्षिण कोल्हापूर),बाळकृष्ण शंकर देसाई (कराड- दक्षिण), डॉ.बाळासाहेब चव्हाण (कोरेगाव), दिपक नारायण शामदिरे (कोथरूड), अनिल शंकर कु-हाडे (शिवाजी नगर ), मिलिंद ई. काची (कसबा पेठ),शहानवाला जब्बार शेख (भोसरी) शाकिर इसालाल तांबोळी (इस्लामपूर), किसन चव्हाण (पाथरडी-शेवगाव ) अरुण जाधव (कर्जत-जामखेड), सुधीर शंकरराव पोतदार (औसा ),चंद्र्लाल वकटुजी मेश्राम (ब्रम्हपुरी), अरविंद सांडेकर (चिमुर), माधव कोहळे (राळेगाव) शेख शफी अब्दुल नबी शेख (जळगाव), लालसू नागोटी (अहेरी), मणियार राजासाब (लातूर शहर), नंदकिशोर कूयटे (मोर्शी) एड.आमोद बावने (वरोरा), अशोक विजय गायकवाड (कोपरगाव)