संजय राऊतांच्या “या” फाईलमध्ये दडलंय काय ?

संजय राऊतांच्या “या” फाईलमध्ये दडलंय काय ?

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : संपूर्ण राज्यात सध्या चर्चेत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल राज्यपालांची भेट भेटली.या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मात्र ही पत्रकार परिषद सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी घाईघाईत एक फाईल आपल्या अंगरक्षकाकडे दिले.अनेकदा याबाबत विचारून राऊत यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. योग्य वेळी याबाबत बोलू असे सांगतानाच या फाऊलमध्ये महत्वाची कागदपत्रे असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.

शिवसेनेला १७५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह काल राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.या भेटीनंतर राऊत आणि कदम यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी राऊत यांच्या जवळ एक फाईल होती.पत्रकार परिषद सुरू होताच काही पत्रकारांचे याकडे लक्ष गेले आणि या फाईल बाबत त्यांनी विचारणा केली असता रामदास कदम यांनी लागलीत ती फाईल आपल्या अंगरक्षकाकडे सोपविली. राऊत यांनी ही फाईल गाडीत ठेवायला सांगितली. त्यावेळी कदमांनीही जीभ बाहेर काढून आपली चूक झाल्याचे दाखवले.दुर्दैवाने ती फाईल समोर आली आहे. फाईलमध्ये काय आहे याचा लवकरच खुलासा करु असे  राऊत यांनी सांगितले असले तरी या फाईलीत दडलेय काय याबाबत उत्सुकता सर्वांनाच होती.

Previous articleया अपक्ष आमदाराने दिला शिवसेनेला पाठिंबा ; शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर
Next articleदेवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री