या अपक्ष आमदाराने दिला शिवसेनेला पाठिंबा ; शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर

या अपक्ष आमदाराने दिला शिवसेनेला पाठिंबा ; शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर

मुंबई नगरी टीम

मुंबई : एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शिवसेनेला पाठिंबा देणा-या आमदारांमध्ये भर पडत असल्याचे दिसते.शिरोळ मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन  पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर पोहचले आहे.

सत्तेचा तिढा वाढतच चालला आहे. मात्र दुसरीकडे अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षांनी तयारी केली आहे. शिरोळ मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन  पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर पोहचले आहे.  एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ही भेट घेतली.अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर पोहचले आहे.यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असून,राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि  बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास असल्यानेच शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले.

यापूर्वीच धुळे जिल्हा साक्रीच्या अपक्ष आमदार  मंजुळा गावित,जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, प्रहार संघटनेचे  अचलपुरचे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे अपक्ष आमदार  राजकुमार पटेल ,नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जैस्वाल , भंडा-याचे अपक्ष आमदार  नरेंद्र भोंडेकर,नेवासाचे अपक्ष आमदार  शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

Previous articleसत्तेची कोंडी फुटणार ! मुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार ?
Next articleसंजय राऊतांच्या “या” फाईलमध्ये दडलंय काय ?