१८ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित

१८ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून,३४ जिल्हा परिषदांपैकी १८ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.नागपूर, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी तर पालघर,रायगड, नांदेडचे  अध्यक्षपद अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.

राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची अरक्षण सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. आज काढण्यात आलेल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या सोडतीत एकूण १८ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षित झाले आहे.नागपूर, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील महिलांसाठी तर पालघर, रायगड,नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती मधील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.ठाणे,सिंधुदूर्ग,सांगली, वर्धा, बीड जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदे खुला वर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये महिलाराज येणार आहे.सोलापूर,जालना जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद अनुसूचित जाती (सर्वसाधारण),नंदूरबार,हिंगोली अनुसूचित जमाती (सर्वसाधारण),लातूर,कोल्हापूर,वाशिम,अमरावती नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण),रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुला (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.

Previous articleलाल दिव्यापेक्षा परळीच्या प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचा आहे
Next article५ जिल्हा परिषदा आणि ३६ पंचायत समित्यांसाठी ७ जानेवारीला निवडणुका