५ जिल्हा परिषदा आणि ३६ पंचायत समित्यांसाठी ७ जानेवारीला निवडणुका

५ जिल्हा परिषदा आणि ३६ पंचायत समित्यांसाठी ७ जानेवारीला निवडणुका

मुंबई नगरीस टीम

मुंबई : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

 मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०१९ पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे -नामनिर्देशनपत्र सादर करणे- १८ ते २३ डिसेंबर २०१९,नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ डिसेंबर २०१९, अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- ३० डिसेंबर २०१९,अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- १ जानेवारी २०२०,मतदानाचा दिनांक- ७ जानेवारी २०२०,मतमोजणीचा दिनांक- ८ जानेवारी २०२०

Previous article१८ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित
Next articleशुक्रवारी शिवसेना आमदारांची  महत्वपूर्ण बैठक