हा गोवा नाही महाराष्ट्र आहे : शरद पवारांनी ठणकावले

हा गोवा नाही महाराष्ट्र आहे : शरद पवारांनी ठणकावले

मुंबई नगरी टीम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हिप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही.ज्यांना पक्षाने पदावरुन हटवले आहे. त्यांना व्हिप काढण्याचा कोणताही अधिकार नसून,ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे.त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्व:त घेतो, असे स्पष्ट करतानाच, भाजपकडून संसदीय नियम तोडले जात आहे. हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. अयोग्य काही लादले तर महाराष्ट्र धडा शिकवेन अशा शब्दात राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ठणकावले.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर भाजपकडून दगाफटका होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांचे जोरदार शक्तीप्रर्दशन केले. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या १६२ आमदारांची परेड करण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना एकजूट राहण्यासाठी संविधानाची शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदार एकत्र आले होते.यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रस्तावना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते.

यावेळी तिन्हा पक्षांच्या आमदारांना  मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारा यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.त्यांना व्हिप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही.ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्व:त घेतो, असा दिलासा देत, भाजपकडून संसदीय नियम तोडले जात आहे. हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. अयोग्य काही लादले तर महाराष्ट्र धडा शिकवेन असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिला.अवैध पद्धतीने सत्तेवर आलेल्यांना बाजूला करु असेही पवार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करायला सांगितले की करुन दाखवू, नवीन सदस्यांच्या मनात संशय निर्माण केला जात आहे. केंद्रातील लोकांनी अनेक राज्यात चुकीचे केले आहे, आम्ही घटनातज्ञाकडून माहिती घेतलेली आहे. ज्यांना पक्षाने बाजूला ठेवले आणि त्यांना कुठलाच अधिकार नाही असेही पवार यांनी स्पष्ट करताच सर्व आमदारांनी टाळ्याच्या गजराने याचे स्वागत केले.

 मी पुन्हा येईन असे म्हणणार नाही, आम्ही आलो आहोत आमचा अडसर मोकळा करा. वाटेतून बाजूला झाला नाहीत तर तुमचे काय करायचे आहे ते आम्हाला सांगायची गरज नाही. जो काही फोडाफोडीचा केविलवाणा प्रयत्न केला तो आणखी करा म्हणजे आम्ही आणखी एकजूट होऊ असे , सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणात सांगितले.

Previous articleभाजपा बहुमत सिद्ध करु शकणार नाही
Next articleअजित पवारांशी माझा काहीच संबंध राहिलेला नाही : धनंजय मुंडे