शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार

शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे आज शिवतीर्तावर होणा-या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणार आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

आज शिवतीर्थावर काही वेळातच महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे राज्याचे १९ वे  मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर त्याच्याबरोबरच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उपमुख्यमंत्री म्हणून तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे मंत्रीपादाची शपथ घेणार आहे. पहिल्या टप्प्यात तिन्हीही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल तर नव्या सरकारला येत्या तीन डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार ३ तारखेनंतरच होणार आहे.

Previous articleस्टँपपेपरवर लिहून देतो.. हे सरकार पाच वर्षे टिकणार
Next articleशेतक-यांना कर्जमाफी, बेरोजगारांना नोक-या देणार