सहा वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

सहा वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई :राज्य सरकारने आज सहा वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.भूषण गगराणी आणि विकास खारगे यांची नियुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज सहा सनदी तर एका अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील अधिका-यांची बदली केली आहे. उद्योग विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.डॅा. निपूण विनायक यांची महानगरपालिका प्रशासन मुंबई येथे आयुक्त तथा संचालक या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.विक्रीकर सह आयुक्त म्हणून आनंद रायते यांची तर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे  संचालक अमोल येडगे यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जिल्हा परिषद येथे करण्यात आली आहे.नंदुरबार येथिल सरदार सरोवर प्रकल्पाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के.एच. भक्ते यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषद येथे करण्यात आली आहे.

Previous articleअखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला… भुजबळ काय म्हणाले !
Next articleसहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी ९ जानेवारीला मतदान