राज्यातील ७ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने राज्यातील वरिष्ठ सात सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर केली आहे.

जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नियुक्ती एस चोकलिंगम यांची नियुक्ती महासंचालक यशदा पुणे येथे केली आहे.राजेश पी पाटील यांची नियुक्ती आंतरराज्य प्रतिनियुक्तीने राज्य महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी,येथे करण्यात आली आहे.श्रीमती शितल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक,वस्त्रोद्योग, नागपूर येथे करण्यात आली आहे.अपंग कल्याण आयुक्त पुणे श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांची बदली वर्धाचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.अनिता पाटील भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमिअभिलेख, पनवेल यांची नियुक्ती सदस्य सचिव,राज्य महिला आयोग, मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.तर एन के सुधांशु यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर,जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleकाँग्रेस महाराष्ट्रात १ नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले
Next articleखळबळजनक ! पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कॅबिनेटमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी