छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नाही : छगन भुजबळ

छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नाही : छगन भुजबळ

मुंबई नगरी टीम

नाशिक : याअगोदर देशात काहींची तुलना कधी प्रभुराम चंद्र तर कधी शिवशंभू बरोबर केली गेली. त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल तर जनता कदापी सहन केली जाणार नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केलं होतं. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनपतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती.राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्याच्या काडीला देखील हात लावता कामा नये अशी व्यवस्था होती.आज मात्र मोदी सरकारकडून व्यवस्था पायदळी तुडविली जात आहे. ते ज्या प्रकारे कायदे करत आहे. त्यात जनहित नसून कुठल्यातरी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे. जेएनयु सारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. त्यावर कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत असे कधीही घडले नाही त्यांचे राज्य हे रयतेच राज्य होत.त्यांच्या नावावरच निवडणुकीत मते मागितली गेली. त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी शक्य नसल्याची टीका त्यांनी केली.कुठल्याही लेखकाने भट गिरी तरी किती करावी. आणि ती करत असतांना आपण कुठल्या व्यक्तीची तुलना कोणाशी करत आहोत याचे भान ठेवण आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकाशनांवर तसेच पुस्तकांवर बंदी घातली पाहिजे असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

Previous articleपत्राचाळ प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Next article” त्या” पुस्तकाच्या विरोधात उद्या काँग्रेसचे राज्यभर आंदोलन : बाळासाहेब थोरात