सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री

सतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोल्हापूरचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्याकडे असेलेले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.तर भंडारा जिल्हा पालकमंत्रीपदी डॉ.विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र स्वत: कडे कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद असल्याने थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता.तशी विनंती त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती.हे पद राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्याकडे सोपविण्यासाठी ते प्रयत्नशील होते.यापूर्वी सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. आता कोल्हापूरची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने भंडारा जिल्हा पालकमंत्रीपदी डॉ.विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous articleभाजपा छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार : अजित पवार