पवारांचा नाद करू नका,पवार कळायला १० जन्म अपुरे पडतील!

पवारांचा नाद करू नका,पवार कळायला १० जन्म अपुरे पडतील!

मुंबई नगरी टीम

नागपूर : आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणे केली.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनैसर्गिक युती करून आलेले हे सरकार जनादेशाविरुद्ध असल्याचा सूर आळवत फडणवीसांनी सडकून टीका केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये यापूर्वी शरद पवारांवर केलेल्या टीकेचीही आठवण करून दिली.यावर उत्तर देताना मुंडेंनी आपल्याच एका भाषणाचा संदर्भ देत’पवारांचा नाद करू नका,’ असे सांगून पवार हा एक विचार आहे, ते कळायला दहा जन्म अपुरे पडतील असा टोला फडणवीसांना लगावला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या तत्कालीन भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याचे पाप केले असून यामुळेच नियतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली, ते राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनांच्या प्रस्तावावर बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते आ. धनंजय मुंडे यांच्यामध्ये आज सभागृहात आरोप प्रत्यारोपांचा ‘सामना’ चांगलाच रंगला होता. फडणवीसांनी तीन चाकी रिक्षा सारखे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे म्हटल्यानंतर त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना तीन चाकांचे विमानही असते अशी आठवण करून देत तुम्हाला पुन्हा यायला ५ नाही तर १५ वर्ष वाट बघावी लागेल असे टोलाही लगावला!

देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणे केली.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनैसर्गिक युती करून आलेले हे सरकार जनादेशाविरुद्ध असल्याचा सूर आळवत फडणवीसांनी सडकून टीका केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये यापूर्वी शरद पवारांवर केलेल्या टीकेचीही आठवण करून दिली. यावर उत्तर देताना मुंडेंनी आपल्याच एका भाषणाचा संदर्भ देत ‘पवारांचा नाद करू नका,’ असे सांगून पवार हा एक विचार आहे, ते कळायला दहा जन्म अपुरे पडतील असा टोला फडणवीसांना लगावला. विविध विकासकामांना हे सरकार स्थगिती देत सुटले आहे असे म्हणत फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला असता, ग्रामविकास विभागामार्फत २५-१५ च्या कामांमध्ये अनियमीतता असून, पूर्वीच्या सरकारने विकासकामांमध्ये पक्षपाती केला असल्याचा गंभीर आरोपही मुंडेंनी आपल्या भाषणात केला.  पंतप्रधान मोदींना आणून गवगवा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही मुंडेंनी केली.

महाविकास आघाडीचे सरकार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर देणारच आहे, सोबतच दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहे असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले. पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून फसवणूक तर केलीच परंतु ‘भीक नको पण कुत्रा आवर’ या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला, म्हणूनच भाजपच्या हातून नियतीने सत्ता हिरावून घेतली असे परखड मतही मुंडेंनी बोलताना व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या स्थापणेवरून केलेल्या टिकेला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी भाजप नेतृत्वाचे अक्षरशः वाभाडे काढले; भाजपने सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासह सर्व सरकारी यंत्रणा वापरल्या म्हणूनच नियतीने १०५ आमदार असूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे मत व्यक्त केले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले असेही मुंडे म्हणाले.

मागील सरकारने मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, कोरेगाव -भीमा दंगल आदी प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी केली. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आमचे महा विकास आघाडीचे सरकार आधार देईल असा विश्वासही मुंडे यांनी बोलताना व्यक्त केला. ‘मी पुन्हा येईन’ वरून आज पुन्हा एकदा सभागृहात जुगलबंदी व शेरोशायरी पाहायला मिळाली… तीन पक्ष एकमेकांवर शंका घेतात असे म्हणत फडणवीसांनी आज चक्क संत ज्ञानेश्वर यांचा ‘काट्याच्या आणीवर वसले तीन गाव…’ हा भारुड म्हणत खिल्ली उडवली. तर सत्ता पक्षाच्या वतीने धनंजय मुंडे यांनी ‘….ये कैचिया खाक हमे रोकेंगी, हम परो से नही, हौसलो से उडा करते है! ‘ असे म्हणत त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आमचे सरकार १५ वर्ष टिकणार असून तुम्हाला पुन्हा येण्यासाठी तेवढी प्रतिक्षा करावी लागेल असा टोलाही फडनवीसांना लगावला.

Previous articleहे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही :  फडणवीस
Next articleआयुष्यभर भाजपाची पालखी वाहणार नाही : उद्धव ठाकरे