दिखाओ चप्पल,फेको पत्थर,ये तो शौक हैं पुराना आपका : अमृता फडणवीसांची शिवसेनेवर टीका

दिखाओ चप्पल,फेको पत्थर,ये तो शौक हैं पुराना आपका : अमृता फडणवीसांची शिवसेनेवर टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.तुम्ही इतरांना मारझोड करून नेतृत्व करू शकत नाही.तो हल्ला असतो,नेतृत्व नव्हे, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर,ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे,असा शेरही त्यांनी या माध्यमातून शिवसेनेला सुनावला आहे.

केवळ ठाकरे आडनाव असून भागत नाही.त्यासाठी व्यक्तीला तत्वांचे प्रामाणिकपणे पालन आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करावे लागते असे ट्विट करून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विट नंतर शिवसेनेच्या महिला आघाडीने त्यांना निर्वाणीचा इशारा देत आंदोलन केले होते.अमृता फडणवीस हे नाव हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर संपूर्ण राज्याला समजले. कळले. त्यापूर्वी त्यांच्याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. याउलट ठाकरे घराण्यातील चार पिढ्यांना महाराष्ट्र ओळखतो. त्यामुळे फडणवीस यांनी आम्हाला प्रमाणपत्र देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांनी आधी स्वत:चे घर सांभाळावे आणि मग आम्हाला सांगावे,अशा शब्दात विशाखा राऊत अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. या वाद थंड होत नाही तोच अमृता फडणवीस यांनी आज पुन्हा निशाणा साधला आहे.आज त्यांनी ट्विट करीत शिवसेनेवर टीका केली आहे.तुम्ही इतरांना मारझोड करून नेतृत्व करू शकत नाही.तो हल्ला असतो,नेतृत्व नव्हे, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे.दिखाओ चप्पल, फेको पत्थर,ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे,या शेरच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Previous articleदेशाचे पंतप्रधान खोटं बोलतात! : सचिन सावंत
Next articleसचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट