सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई नगरी टीम
मुंबई: प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी आज मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.त्यांची हि सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले तरी त्यांची सुरक्षा कमी केल्यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटले असल्याची चर्चा आहे.
जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली.या भेटीवेळी आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समजला नसला तरी त्यांच्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असे समजते.