अंधेरी पोटनिवडणूक : राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवाराला राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवाराला पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि भाजप आणि शिंदे गटा प्रथमच आमनेसामने येणार आहेत.ही पोटनिवडणूक शिवसेनेसह भाजपने प्रतिष्ठेची केली असल्याने या पोटनिवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी मधिल राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारास यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे.तर आज काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुंबई अध्यक्ष भाई जगताप,माजी मंत्री अमित देशमुख,प्रवक्ते डॉ राजू वाघमारे,खासदार विनायक राऊत,अनिल परब आणि अजय चौधरी यावेळी उपस्थित होते.या भेटीत राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यात आली.अंधेरी पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पूर्ण सहकार्य करून निवडून आणण्याचा शब्द यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

Previous articleउद्धव ठाकरेंना टोला : वेळ काढून कायदा टाळता येत नाही,कधीतरी त्याला सामोर जावे लागते
Next articleयापूर्वी ‘मशाल’ चिन्ह कोणत्या पक्षाचे होते ? कोणत्या कारणामुळे शिंदे गटाला ‘गदा’ चिन्ह नाकारलं