हिंगणघाट खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

मुंबई नगरी टीम
मुंबई : हिंगणघाट जळीता हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी,यासाठी तपास यंत्रणा काम करेल.अशा घटनेत तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. पीडीता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल. त्यासाठी अॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो.
आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी शक्य तितक्या जलद गतीने प्रयत्न करावेत, यासाठी संबंधित यंत्रणांना गतीमान केले आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावा यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले आहेत.महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही. स्त्री-सन्मानाच्या आपल्या संस्कृतीची घरा-घरात उजळणी करावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Previous articleराज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला सादर होणार
Next articleतर राज्यात अराजकता निर्माण होईल : प्रविण दरेकर