आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत : उदय सामंत

मुंबई नगरी टीम
मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते स्वत:च्या पायावर उभे राहू असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी राज्यामध्ये आदर्श कौशल्य विकास केंद्रे निर्माण करावीत. विशेषतः प्रत्येक विभागातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधारित पदविका अभ्यासक्रम तयार करावा. त्यामुळे स्थानिक पातळींवरील अडचणी सोडविण्यास मदत होईल आणि रोजगार निर्मिती होईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय येथे राज्य तंत्रशिक्षण मंडळ- नियामक परिषदेची ३२ वी बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली.राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयासाठीच्या पुणे येथील बांधकामाच्या पुनर्विलोकीत सुधारित अंदाजपत्रकाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामध्ये इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करुन शिक्षक प्रशिक्षण केंद्राकरिता इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सोयीसुविधा निर्माण करुन या केंद्रातून प्रशिक्षणास सुरूवात करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामंत यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुढील ५ वर्षाकरिता २०१९-२०१४ बृहत आराखड्याच्या अंमलबजावणी धोरणाबाबत चर्चा करणे व त्यास मान्यता देणे, वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या ताळेबंदावर चर्चा व मान्यता देणे, अंतर्गत व बाह्य लेखापरीक्षकांच्या लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे, वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या वित्तीय अर्थसंकल्पावर चर्चा व मान्यता देणे यावर चर्चा करण्यात आली.

Previous articleविमान चुकलेल्या सैनिकाला धनंजय मुंडेंनी श्रीनगरचे तिकीट काढून दिले
Next articleरविंद्र वायकरांची मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती