अबब…राज्यात आणि मुंबईत गेल्या वर्षी एवढ्या नवजात बालकांचा मृत्यु

मुंबई नगरी टीम

मुंबई : एचएमआयएसच्या अहवालानुसार राज्यात गेल्या  वर्षी म्हणजेच २०१८-२०१९ मध्ये तब्बल २ लाख ११ हजार ७७२ बालकांचे जन्मत:च अडीच किलो पेक्षा कमी असून,मुंबई शहर उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची २२ हजार १७९ बाळ जन्मली असल्याची माहिती विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या लेखी उत्तरामुळे पुढे आली आहे. वर्षामध्ये १३ हजार ७० नवजात बालकांच्या मृत्युची नोंद झाली असून,या नोंदीमध्ये १४०२ नवजात बालकांच्या मृत्युची नोंद मुंबई शहरात झाली आहे.

राज्यात नवजात बालकांच्या  मृत्युत झालेल्या वाढीसंदर्भात शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांत्या सह सुमारे ४८ सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.यामध्ये या सदस्यांनी अनेक उपप्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात राज्यातील आणि मुंबईतील वास्तव समोर आले आहे.एच.एम.आय.एस. च्या अहवालानुसार राज्यात सन २०१८-१९ या

काळात २११७७२ बालकांचे वजन जन्मत:च अडीच किलो पेक्षा कमी असून,मुंबई शहर उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची २२१७९ बाळ जन्मली असल्याचे लेखी उत्तरात मान्य करण्यात आले आहे.एच.एम.आय.एस. च्या अहवालानुसार राज्यात २०१८-१९ या वर्षामध्ये १३ हजार ७० नवजात बालकांच्या मृत्युची नोंद झाली असून,या नोंदीमध्ये १४०२ नवजात बालकांच्या मृत्युची नोंद मुंबई शहरात झाली असल्याची बाब या लेखी उत्तरामुळे समोर आली आहे.

एच.एम.आय.एस. च्या अहवालानुसार दिनांक १ एप्रिल, २०१९ ते ३१ डिसेंबर,२०१९ या कालावधीत राज्यात १२१४७ अर्भक मृत्यु, ११०६६ बालमृत्यु वनवजात मृत्यु झाले आहेत. तसेच दिनांक १ एप्रिल, २०१९ ते १५ जानेवारी,२०२० या कालावधीत १०७० इतके मातामृत्यु झालेले आहेत.प्रसुती पूर्व उच्च रक्तदाब, प्रसुती पूर्व व पश्चातअति रक्तस्त्राव, प्रसुती पश्चात किंवा गर्भपात पश्चात जंतदोष व रक्त क्षय ही माता मृत्युची कारणे  असल्याचे या उत्तरात नमुद केले आहे. अकाली जन्माला आलेले बालक,जन्मत: कमी वजनाचे बालक, जंतु संसर्ग, न्युमोनिया, सेप्सीस, जन्मतःश्वसावरोध , आघात, रेस्पीरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम आदी  नवजात बालकांच्या मृत्युची कारणे असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे. कमी वयातील प्रसुती, अकाली प्रसुती, बहुविध प्रसुती, दोन बालकांच्या जन्मामध्ये कमी अंतर हे बालकांचे वजन जन्मत:च कमी असण्याची कारणे असल्याचेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत बालमृत्यु आणि मातांचेमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येतात याचीही माहिती या उत्तरात दिली आहे.

Previous articleधक्कादायक…राज्यात एका वर्षात सापडले एवढे कुष्ठरोगी !
Next articleमुस्लिम आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी