मुंबई नगरी टीम
मुंबई : महाविकास आघाडीच्यावतीने विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली असून,त्यांनी आज दाखल केला आले.भाजपक्षाकडून माजी मंत्री डॉ. अशोक रामाजी उईके यांनी उमेदवारी अर्ज केला असला तरी पक्षीयबलाबल पाहता ते आपला अर्ज माघारी घेण्याची शक्यता असल्याने ही निवडणुक बिनविरोध होवू शकते.
विधानसभेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.या रिक्त पदासाठी शनिवारी मतदान होणार असून,उपाध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने राष्ट्रवादीला संधी दिली असून,विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.भाजपकडून माजी मंत्री अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्याचे पक्षीयबलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार सहज विजयी होवू शकतो त्यामुळे उद्या शनिवारी भाजपचे उमेदवार अशोक उईके माघार घेवू शकतात त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.