…आणि २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या !

मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंत्रालयातील मुख्य इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील दालन क्रमांक ५०१ मधून आपल्या कामकाजाला सुरूवात केली आहे.यावेळी त्यांनी २६/११च्या हल्ल्यात कर्तव्य बजावणारे पोलीस शिपाई अरुण जाधव यांचा सत्कार केला.यावेळी जाधव यांनी २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या केल्या.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना मंत्रालयातील मुख्य इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील ५०१ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. या दालनाचे नुतणीकरण करण्यात आल्यानंतर मंत्री सामंत यांनी आजपासून आपल्या दालनातून कामकाजाला सुरूवात केली.यावेळी मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यावेळी कर्तव्य बजावत असताना दहशतवादी अजमल कसाबकडून जखमी झालेले पोलीस शिपाई अरुण जाधव यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेतली.या वेळी जाधव यांनी २६/११ च्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या केल्या.आपल्या अतुलनीय शौर्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. आपले शौर्य संपूर्ण महाराष्ट्रातील युवा पिढीला प्रेरणादायी असून,आपल्या अतुलनीय साहसाबद्दल आपणास मानाचा मुजरा!, असे सांगून मंत्री सामंत यांनी जाधव यांचा सत्कार केला.

Previous articleमंत्रालयातही कोरोनाचा धसका ; प्रत्येक ठिकाणी रसायनांची फवारणी
Next articleशासकीय कार्यालयांना सुट्टी नाही ;रेल्वे बस सुरू राहणार